आमच्या विषयी
महिला व बाल कल्याण विभाग
प्रस्तावना:
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शिरपूर एक अंतर्गत अंतर्गत एकुण 2१५ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालके यातील पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यात येतो.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील सेवा:
- 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे.
- मुलांच्या योग्य मानसिक, शारिरिक सामाजिक विकासासाठीचा पाया घालणे.
- बालमृत्यु, मुलांचा रोगटपणा, व कुपोषण शाळेची गळती यांचे प्रमाण कमी करणे.
- मातांना पोषक आहार आणि आरेाग्य शिक्षण देऊन मुलांचे सर्वसाधारण आरोग्य आणि पोषक आहार यासंबंधीच्या गोष्टीची अधिक चांगली काळजी घेऊ शकतील अशा प्रकारे त्यांची क्षमता वाढविणे.
- बाल विकासास चालना मिळावी म्हणुन विविध खात्यांमध्ये धोरण व अंमल बजावणी याबाबतीत प्रभावी समन्वय घडवुन आणणे.
उद्यिष्टे:
- पुरक पोषण आहार
आरोग्य तपासणी
पोषण आहार व आरोग्य
संदर्भ सेवा
लसीकरण
अनौपचारीक शाळा पुर्व शिक्षण
दृष्टी आणि ध्येय:
- गरोदर महिला, स्तनदा माता व 0 ते 6 वर्ष बालके यांना आरोग्य व पोषण लाभ देऊन ,माता मृत्यु व बाल मृत्यू शुन्य करणे
- 0 ते 6 वर्ष बालके यांना लसीकरण ,पुरक पोषण आहार,आरोग्य तपसणी इ.सुविधा देऊन कुपोषणमुक्त व सुदृढ बालकांची पिढी निर्माण करणे.
- 3 ते 6 वर्ष बालकांना पुर्व शालेय शिक्षण देऊन त्यांचा शैक्षणिक पाया मजबुत करणे.
- किशोरी मुली व महिला यांना आरोग्य व स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविणे.
उद्दिष्टे आणि कार्ये:
- बालकांच्या योग्य मानसिक, शारीरीक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे
- सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवुन आणणे.
- मृत्यु, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे.
- बालविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरणाची निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे.
- योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याव्दारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणयुक्त आवशक्यते बाबत काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे.